अरे बापरे..! महापुरातून आली अन् विहिरीत विसावली...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पूर ओसरला तेव्हा ते साधरण 1 फूट लांबीचे होते. मात्र आज पकडले तेव्हा ते 4 फुटाचे होते. ते विहिरीतून बाहेर येऊन पुन्हा पाण्यात जात असल्यामुळे यादव कुटुंबाला काळजी लागली होती. 

अंकलखोप (सिंधुदुर्ग) - येथील दिलीप, सतीश व राजेंद्र भाऊसाहेब यादव यांचे वैभवनगर रस्त्यालगत घर, शेत आहे. शेतातील विहिरीत 
साधरण 4 फूट लांबीच्या मगरीचा गेले काही महिने मुक्काम होता. जुलै - ऑगस्ट 2019 च्या महापुराच्या पाण्यातून हे मगरीचे पिलू आले होते. पूर ओसरला तेव्हा ते साधरण 1 फूट लांबीचे होते. मात्र आज पकडले तेव्हा ते 4 फुटाचे होते. ते विहिरीतून बाहेर येऊन पुन्हा पाण्यात जात असल्यामुळे यादव कुटुंबाला काळजी लागली होती. 

सध्या विहिरीचे बांधकाम सुरू आहे. आज सकाळी विहिरी बाहेर आले होते. विहिरीचा काठ व बांधकामाच्या भिंतीच्या मध्ये ते मगरीचे पिल्लू अडकून राहिले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. मात्र सुटका होत नव्हती. तेव्हा राजेंद्र यादव, त्यांचा मुलगा संदीप यादव, पुतण्या राहुल व संतोष यांनी प्रयत्न करून तिला विहिरीतुन बाहेर काढली. त्यानंतर सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. 

यावेळी वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी शाहजी टवरे, वन सहायक सागर गोयकर, प्राणीमित्र विवेक सुतार , मोहसीन सुतार हे उपस्थित होते. 
त्यांनी या मगरीस त्याब्यात घेऊन तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crocodile well ankalkhop sangli district