

Pomegranate growers in Atpadi inspect flowers dropped prematurely due to weather impact.
-नागेश गायकवाड
आटपाडी: अगोदरच तेल्या, पिन बोर आणि मर रोगाने त्रस्त झालेला डाळिंब उत्पादक आता गेल्या काही दिवसांपासूनच्या प्रतिकूल हवामानामुळे हवालदिल झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात हंगाम धरलेल्या अनेक शेतकऱ्यांनी भरमसाठ खर्च करूनही यश मिळत नसल्याने हंगाम अर्ध्यावरच सोडला आहे.