कर्जतच्या तब्लिग इज्तेमाला अलोट गर्दी 

The crowd of Karjat's Tablig Iztema
The crowd of Karjat's Tablig Iztema
Updated on

कर्जत : तब्लिग इज्तेमाच्या शेवटच्या दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी झालेली ही आजपर्यंतची उच्चांकी गर्दी होती. रात्री मगरीब नमाज पठणानंतर विश्वशांतीसाठी दुवा मागण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास भेट दिली. 

मुस्लीम बांधव दोन दिवशीय इज्तेमा संपल्यानंतर एकमेकांची खुशाली विचारीत व ती अबाधित राहण्याच्या शुभेच्छा देत पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेत होत होते. कर्जत तालुका या सोहळ्याचा आयोजक होता. 

लाखोंच्या संख्येने सहभागी झालेले मुस्लीम बांधव शहरासह ठिकठिकाणी झालेल्या स्वागताने भारावून गेले होते. हिंदूसह इतर समाज बांधवांची उपस्थिती, उत्कृष्ट नियोजन, आनंद बाजारात विविध पदार्थ व वस्तूंची विक्री-खरेदीसाठी उडालेली झुंबड हे या सोहळ्याची वैशिष्ट्य ठरले. इज्तेमासाठी उभारलेला शामियाना भाविकांच्या गर्दीमुळे ओसंडून वाहत होता. 

या तब्लिग इज्तेमासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून व लगतच्या जिल्ह्यातून मुस्लीम बांधवांचा ओघ आज दिवसभर मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्या मुळे मिरजगाव रस्ता, राशीन रस्ता, करमाळा, कुळधरण, माहीजळगावसह शहराकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मात्र, योग्य नियोजनामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. पोलिस प्रशासन आणि संयोजकांनी काळजी घेतल्याचे दिसत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com