पंधरवड्याची भिती: सांगलीत बाजारपेठेत तोबा गर्दी 

crowd in Sangli due to curfew sangli marathi news
crowd in Sangli due to curfew sangli marathi news

सांगली  : कोरोनाला रोखण्यासाठी "ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून पुढील पंधरा दिवस संचारबंदी लागू होत आहे. शासनाने बाहेर फिरण्यावर कडक बंधने घालण्याचा इशारा दिल्याने आज सकाळपासूनच बाजारात गर्दी दिसत होती. पुढचा पंधरवडा घरबंद राहण्याची वेळ येणार असल्याने जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु होती. 

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा प्रतीदिन सातशेच्या घरात गेल्याने कोरोनाची दहशत वाढत आहे. पण, त्याचबरोबर जगण्याशीही संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन न करता जनतेवर कडक निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी आज रात्री आठपासून होणार आहे. त्यातच आज आंबेडकर जयंतीनिमित्त सुटी असल्याने नागरिक बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.

बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. मात्र किरणा दुकाने, बेकरी, धान्य दुकाने, मार्केट यार्डातील दुकाने उघडी होती. तेथे नागरिकांनी पुढची पंधरा दिवस पुरेल इतकी जीवनावश्‍य वस्तूंची खरेदी करण्याचा कल दिसून आला.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com