सांगलीत आठवडा बाजारात तोबा गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

सांगली ः "कोरोना' विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे दिसते आहे. मात्र, शहरातील शनिवारचा आठवडा बाजारात मात्र तोबा गर्दी दिसून आली. बाजारात भाजीपाला व जीवनावश्‍यक साहित्य वगळता अन्य कोणतेही साहित्याचे स्टॉल्स कोणी लावू नयेत, अशा सूचना देवूनही स्टॉल्स्‌ लागलेले दिसले. 

जगभर पसरेला कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रातही पसरू लागला आहे. संशयितांच्या संख्येत वाढ होवू लागली असून प्रशासन खबरदारी घेत आहे. सांगली प्रशासनानेही खबरदारी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणे गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली. हॉटेल्स्‌, मॉल्स्‌ बंद करण्यात आले आहेत. तसेच परगावी जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्याने एसटी स्टॅंडवरही शुकशुकाट दिसून आला. येथील बालाजी चौकात शनिवारी आठवडा बाजार भरतो. आज मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. 

कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव होऊ नये आणि गर्दीमुळे संसर्ग होण्याची शक्‍यता असल्याने बाजारामध्ये फक्त भाजीपाला आणि जीवनावश्‍यक साहित्य वगळता कोणत्याही वस्तूची विक्रीचे स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, तरीही भाजीपाला व्यतिरिक्त अन्य स्टॉल्स्‌ दिसून आले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowds in the market