सिध्देश्‍वर देवस्थानाचा लोकोत्सवासाठी पुढाकार

प्रशांत देशपांडे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

■ दारूकामाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य

■ जिल्ह्यासह राज्यातील कलावंतांना संधी

■ सोलापूर जिल्ह्यात खूप कलाकार

सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्‍वर महाराजांच्या यात्रेची सांगता शोभेच्या दारूकामाने होते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून सोलापूरकरांकडून दारूकामाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी मागणी होत आहे. यासाठी सिध्देश्‍वर मंदिर देवस्थान समिती पुढाकार घेणार आहे.

हे ही वाचा

मोकाट जनावरांवरील कारवाईचा फार्स

दारूकाम होम मैदानावर होत असते. जानेवारी महिन्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फुफाटा उडतो. दारूकाम पाहण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील बहुसंख्य नागरिकांची गर्दी असते. त्यांना हवेच्या प्रदुषणाचा त्रास होतो. गेल्या चार ते पाच वर्षापासून मंदिर समिती धुळीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न करते. मैदानावर पाणी मारले जाते. पण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल होतो. चिखलात नागरिकांना उभारण्यास त्रास होतो. या हवा प्रदुषणामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. सोलापूरातील नागरिकांनी या दारूकामाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी मागणी केली होती. आता मंदिर समिती पुढाकार घेणार आहे.

हे ही वाचा

परीक्षेआधीच निकाल

येत्या यात्रेत आरंभी 20 ते 25 मिनीटे दारूकाम आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात गोंदिया आणि गडचिरोली भागतील भारूड, नांदी, शंखनाद या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीतील कलाकारांना सहभागी करून घेता येईल; जेणे करून विविध कलाकारांना आणि कलेला चांगले व्यासपीठ मिळेल, असे बोलले जात आहे.
 

हेही वाचा

कांद्याने मोडले सगळे विक्रम

सिध्देश्‍वर यात्रेत दारूकामाऐवजी सांस्कृतिक महोत्सव होणे गरजेचे आहे. तसेच सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात भर पडेल. आजही गोंदिया आणि गडचिरोली भागातील लोककला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती नाही. त्याची सुरूवात सोलापूरातून व्हावी.
डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू
-
दारूकाम बंद करून सोलापूर महोत्सवाप्रमाणे सिध्देश्‍वर लोकमहोत्सव भरविण्याचा मानस आहे. त्यातच दारूकाम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन पुढच्या यात्रेत करण्याचे नियोजन आहे.
धर्मराज काडादी, सिध्देश्‍वर देवस्थान समिती अध्यक्ष
-
सिध्देश्‍वर यात्रेतील दारूकाम बंद होणे गरजेचे आहे. दारूकाम झाल्यानंतर पुढचे काही दिवस मोठ्या

प्रमाणावर धूळ आणि हवेचे प्रदुषण होते. सोलापूर जिल्ह्यात खूप कलाकार आहेत. त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एखाद्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे.
रवींद्र देशमुख, कलावंत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cultural festival held in siddheshwar yatra

फोटो गॅलरी