डी. एड., बी.एड. विद्यार्थ्यांचे डिग्री जलाव आंदोलन 

दिलीप क्षीरसागर 
Friday, 10 July 2020

कामेरी (सांगली) - राज्यात रखडलेली शिक्षकभरती व अन्य मागण्यासाठी डी एड. बी.एड.असोसिएशन यांच्या वतीने घरात बसून आज डिग्री जलाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे ई-मेलच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडल्या. 

राज्यातील पवित्र पोर्टल च्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती गेले अनेक वर्षे रखडले आहे. ही तात्काळ करावी. शिक्षणसेवकांचे मानधनवाढ करावी., 50 टक्के मागासवर्गीय पदकपात, बी. एम. सी मधील रिजेक्‍ट उमेदवार याना न्याय देण्यात यावा व इतर मागण्यांसाठी आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनात करण्यात आले. व शासनाचा निषेध करण्यात आले.

शासनाने वरील मागण्यांकडे सकारात्मक निर्णय घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने आगामी काळात या पेक्षा तीव्र आंदोलन राज्यात छेडले जाईल असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष , संदीप कांबळे अर्चना सानप, सचिव प्रशांत शिंदे पाटील, सरचिटणीस विजयराज घुगे, दत्ता काळे, संघटक वैभव फटांगरे, शरद पिंगळे पाटील, राज्य कार्यकरणी सदस्य अश्विनी कडू, रुपाली पवार, वैभव गरड ,तुषार देशमुख, विश्वास घोडे पाटील, स्वाती तौर, राम जाधव यांनी केले आहे .

 संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: D. Ed., B.Ed. Students' degree burning movement