‘दमसा’चे ग्रंथ, काव्य पुरस्कार जाहीर

‘दमसा’चे ग्रंथ, काव्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची निवड करण्यात आली.

रविवारी (ता. १२) शाहू स्मारक भवनाच्या मिनी सभागृहात डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मरणार्थ रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी नांदेडच्या सुचिता खल्लाळ यांच्या प्रलयानंतरची तळटीप  आणि जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या संदर्भासहित या काव्यसंग्रहांची निवड करण्यात आली आहे.  

पुरस्कारप्राप्त पुस्तक व लेखक असे -  
देवदत्त पाटील पुरस्कार- आटपाट देशातल्या गोष्टी (कादंबरी), संग्राम गायकवाड, शंकर खंडू पाटील पुरस्कार- कायधुळ (कथासंग्रह) दिनकर कुटे. अण्णा भाऊ साठे पुरस्कार- एका लोकलढ्याची यशोगाथा- संपत देसाई, कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार- मराठी कादंबरी; आशय आणि आविष्कार (संकीर्ण) - दत्ता घोलप, चैतन्य माने पुरस्कार- निखळ जागर संवेदनांचा- आलोक जत्राटकर, शैला सायनाकर पुरस्कार- वेद्नांकित गुंघरांचे संदर्भ- महादेव कांबळे, बालवाङ्‌मय पुरस्कार- माझा राजा शाहूराजा- गायत्री शिंदे,

विशेष पुरस्कार- डॉ. गो. मा. पवार पुरस्कार- मराठीतील कलावादी समीक्षा वि. दा. वासमकर. डॉ. विजय निंबाळकर पुरस्कार- सम्यक समीक्षा- संजय कांबळे, वाळवान- रवी राजमाने, महाप्रस्थान- भास्कर जाधव, वर्तमानाचे टोक- जीवन साळोखे, चैत्रपालवी- श्रीधर कुडळे, समकालीन मराठी साहित्य- दत्ता पाटील, नीलेश शेळके, मनीमानसी- ऊर्मिला आगरकर, आजीची पोतडी- दत्तात्रय मनुगडे, जॉयस्टिक- सोनाली नवांगुळ, सह्याद्रीच्या खोऱ्यात- रघुराज मेटकरी, रुतुफेरा- सलीम सरदार मुल्ला, काळीज काटा- सुनील जवंजाळ, महर्षी महेश योगी- सुनील पाटील, गाऱ्हाणं- धनाजी घोरपडे, ओळंबा- कोष्टी, डोंट वरी बी हॅपी- सविता नाबर, काव्यांजली- अंजली देसाई, होरपळ आणि हिरवळ- योजना मोहिते, धनाजी गुरव यांची मुलाखत- प्रशांत नागावकर, किलबिल गोष्टी- कबीर व्हाराले, मिथकांचा रंगाविष्कार- दिनेश वागुबरे, निळ्या लाटा- प्रमोद बाबर, बंधन- किरण कुलकर्णी.

दरवषी पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटकमधील साहित्यिक व त्यांच्या साहित्यकृतींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेच्या गौरी भोगले, सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com