भिडेंच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात?; समरजितसिंह घाटगेंना सवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

कागल - स्वतःला राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारस म्हणून डांगोरा पिटणारे समरजितसिंह घाटगे हे संभाजी भिडे गुरुजींच्या मांडीला मांडी लावून बसलेच कसे? असा सवाल येथील दलित कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. 

कागल - स्वतःला राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारस म्हणून डांगोरा पिटणारे समरजितसिंह घाटगे हे संभाजी भिडे गुरुजींच्या मांडीला मांडी लावून बसलेच कसे? असा सवाल येथील दलित कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, आमदार हसन मुश्रीफ व सामाजिक न्यायमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा स्नेह असल्यामुळेच शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०१९-२० मधून दलित वस्तीच्या विकासकामांसाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच या कामांची प्रशासकीय मान्यता मिळून कामे सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु या कामांना स्थगिती देण्याची पत्रे समरजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि या विभागाचे मंत्री यांना दिली आहेत. त्यामुळेच दलित आणि बहुजन बांधवांनी सहायक समाज कल्याण आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यापुढे अन्याय सहन करणार नाही, असेही या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर दलित मित्र बळवंतराव माने, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, सुधाकर सोनुले, गणेश सोनुले, संजय हेगडे, रणजित कांबळे, प्रवीण कांबळे आदींच्या सह्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dalit activist critic Samarjit Ghatge