esakal | द्राक्षासाठी विम्याला १५ ऑक्टोबरची मुदत | Paschim maharshtra
sakal

बोलून बातमी शोधा

grapes

द्राक्षासाठी विम्याला १५ ऑक्टोबरची मुदत

sakal_logo
By
विष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा

सांगली : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२१-२२ या योजनेची अंमलबजावणी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत, अंबिया बहार मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना विमा बँकाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत पीकनिहाय अशी आहे. द्राक्ष फळपिकासाठी १५ ऑक्टोबर २०२१, केळी फळपिकासाठी ३१ ऑक्टोबर २०२१, आंबा (क) फळपिकासाठी ३१ डिसेंबर २०२१ आणि डाळिंब फळपिकासाठी १४ जानेवारी २०२२ अशी आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित खातेदारांव्यातिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केलेला आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्यशासन व शेतकरी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून ३५ टक्क्यावरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी ५०:५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.

loading image
go to top