esakal | विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा मृत्यू:निपाणीतील घटना; हेस्कॉमचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा मृत्यू;निपाणीतील घटना

विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा मृत्यू;निपाणीतील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का बसून कंत्राटी मजुराचा जागीच मृत्यू झाला. निपाणी येथील नेहरू चौकात मंगळवारी (ता.6) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बसाप्पा सत्याप्पा कमते (वय 48, रा. धुळगोणवाडी) असे दुर्दैवी मजुराचे नाव आहे. या घटनेमुळे निपाणी हेस्कॉम कार्यालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.death-of-an-employee-due-to-electric-shock-incident-in-nipani-crime-marathi-news

याबाबत निपाणी शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी,

अंमलझरी येथील खासगी कंत्राटदार सुभाष कंकणवाडे यांच्याकडे बसाप्पा कमते हे काम करत होते. मंगळवारी येथील नेहरू चौकात वीजवाहिन्या दुरुस्तीसाठी कमते हे खांबावर चढले होते. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक विद्युत वाहिन्यामध्ये विजेचा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे ते खांबावरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कंत्राटदार सुभाष कंकणवाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर महात्मा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत बसाप्पा कमते यांची आई गंगव्वा सत्याप्पा कमते यांनी निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कमते कुटुंबीयांची परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. कमते यांच्या मृत्यूमुळे धुळगोणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा-'गोकुळ' च्या शासन नियुक्त संचालक पदी मुरलीधर जाधव यांची निवड

हेस्कॉमचा कारभार प्रभारीवरच

निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयातील मुख्य अभियंता संजय सुखसारे त्यांची बदली झाली आहे. त्यामुळे अक्षय चौगुले हे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. कार्यालयातील मुख्य जबाबदार अधिकारीच नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

loading image