esakal | 'गोकुळ' च्या शासन नियुक्त संचालक पदी मुरलीधर जाधव यांची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

'गोकुळ' च्या शासन नियुक्त संचालक पदी मुरलीधर जाधव यांची निवड

'गोकुळ' च्या शासन नियुक्त संचालक पदी मुरलीधर जाधव यांची निवड

sakal_logo
By
बाळासाहेब कांबळे

हुपरी (कोल्हापूर) : गोकुळमध्ये (gokul) सत्तांतर झाल्यानंतर स्वीकृत व शासननियुक्त संचालक पदासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या अनेक मातब्बरांनी फिल्डिंग लावली असतानाच आज शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख मुरलीधर रघुनाथ जाधव (muralidhar jadhav)यांची शासनाने निवड केली. निवडीने प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला महत्त्वाच्या पदावर संधी मिळाली आहे. (muralidhar-jadhav-elected-as-gokul-government-appointed-director-kolhapue-news)

‘गोकुळ’ची निवडणूक राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेसह जनसुराज्य शक्ती पक्षाने एकत्रित लढवली. सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडवत विरोधकांनी संचालकपदाच्या २१ पैकी १७ जागा जिंकून सत्तांतर घडवले. त्यानंतर स्वीकृत्त आणि शासननियुक्त संचालक पदासाठी अनेक पराभूत उमेदवारांसह माघार घेऊन विरोधी आघाडीला पाठिंबा दिलेल्या अनेक मातब्बरांनी फिल्डींग लावली होती.

‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पॅनेल निश्‍चित करतानाच पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही लोकांना स्विकृत्त किंवा शासननियुक्त संचालक करण्याबरोबरच विविध महामंडळाचा शब्द दिला होता. अशा काहींनी ‘गोकुळ’मध्येच वर्णी लागावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले होते. पण मातब्बरांना बाजूला ठेवून जाधव (रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांनी बाजी मारली.

हेही वाचा- अन्यथा दुकानदारांसह रस्त्यावर उतरणार; राजू शेट्टींचा इशारा

जाधव २० वर्षापासून सेनेत आहेत. यापुर्वी त्यांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघासह इचलकरंजी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पक्षातील निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. जिल्ह्यातील शिवसेनेने अनेक स्थित्यंतरे पाहिली, त्यात जाधव सेनेसोबतच राहिले, त्याचेच फळ निवडीच्या निमित्ताने मिळाल्याची भावना आहे. पूर्वी या पदावर भाजपचे निष्‍ठावंत विजय उर्फ बाबा देसाई यांची निवड झाली होती. श्री. जाधव यांच्या निवडीने सेनेला ‘गोकुळ’मध्ये आणखी एक लॉटरी लागली आहे.

प्रामाणिकपणाचे फळ : जाधव

‘गोकुळ’च्या शासन नियुक्ती संचालकपदी झालेली निवड म्हणजे २० वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ आहे, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर श्री. जाधव यांनी व्यक्त केली.

स्वीकृत्तसाठी इच्छुक सरसावले

शासननियुक्त संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर स्वीकृत्त संचालक पदाच्या दोन जागांसाठी इच्छुक सरसावले आहेत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील व श्री. मुश्रीफ यांच्या आघाडीतील चार उमेदवारांचा पराभव झाला, यापैकी काहींनी निकालानंतरच आपआपल्या नेत्यांकडे स्विकृत्तसाठी हट्ट धरला आहे. तर निवडणूक रिंगणात माघार घेवून विरोधी आघाडीला पाठिंबा दिलेल्यांनीही यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

loading image