सांगली : बनपुरी येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा बूडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

  • बनपुरी येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा तलावातील पाण्यात बूडून मृत्यू.
  • संभाजी जगन्नाथ बोडरे (40) असे मृत तरुणाचे नाव. 

आटपाडी - बनपुरी येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा तलावातील पाण्यात बूडून मृत्यू झाला. संभाजी जगन्नाथ बोडरे (40) असे मृत तरुणाचे नाव आहे.  

याबाबत मिळालेली माहिती अशी,  संभाजी बोडरे यांना मासेमारीचा छंद होता. ते कोकरेवस्तीवर कुटुंबासोबत राहत होते. गेल्या दोन दिवसापासून ते बेपत्ता होते. घरातील व्यक्तींनी बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केली पण ठावठिकाणा लागला नव्हता.

पानसरे हत्या प्रकरणातील  संशयितांची या तपासासाठी वाढवली कोठडी

सकाळी मिटकी तलावावर शेतकरी मोटर सुरू करण्यासाठी गेल्यावर त्यांना पाण्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी याची माहिती ग्रामस्थ आणि पोलिस पाटलांना दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तपासात हा मृतदेह संभाजी यांचा असल्याचे आढळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of youth in Banpuri in Sangli at the time of Fishing