
टेंभुर्णी : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत भीमानगर हद्दीत गॅस टँकरमधून अनधिकृतपणे चोरून गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरण्यात येत असल्याचे पोलीस अधिकार्यांना कळवूनही याबाबत कारवाई करून गुन्हा दाखल करण्यास टेंभुर्णी पोलिसांनी एकवीस तास एवढा विलंब का केला तसेच सर्व सिलेंडर, गॅस टँकर व टेम्पो असा 70 ते 80 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त न करता या गुन्ह्यात केवळ 6 हजार 744 रूपये किंमतीचा 160 किलोग्रॅम वजनाचा गॅस एवढाच मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पोलीस येथील निरीक्षकांनी कर्तव्यात कसूर करून शासनाची दिशाभूल केली असल्याने या सर्व घटनेची खात्यांतर्गत सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापतीसंजय पाटीलभीमानगरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.