द्राक्ष दलालांना ओळखपत्र देण्याची मागणी

मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर; फसवणूक टाळण्यासाठी शेतकरी येताहेत एकत्र
Grapes
Grapessakal

तासगाव : वायफळे परिसरातील द्राक्ष शेतकऱ्यांची फसवणूक करून द्राक्ष दलाल पळून गेल्याच्या घटनेने पुन्हा एकदा द्राक्ष दलालांच्या ओळखपत्राचा मुद्दा ऐरणीवर आला असून फसवणूक टाळण्यासाठी शेतकरी एकत्र येऊ लागल्याने चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसात फसवणुकीचे दोन प्रकार घडले असल्याने या विषयाचे गांभीर्य वाढले आहे.

द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना द्राक्ष दलालांकडून फसवणूक करून पळून जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. थोडे पैसे देऊन विश्वास संपादन द्राक्षे काढून गोड बोलून पैसे देतो, असे म्हणून पाच-पन्नास लाखांची फसवणूक करून दलाल पळून गेल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.फसवणूक होते, पोलिसात तक्रारी दाखल होतात मात्र तपास होत नाही कारण फसवणूक करण्यासाठीच आलेल्या या दलालांची साधे पूर्ण नावे माहीत, नसतात पत्ता माहीत नसतो, असला तरी बनावट असतो, मग शोधायचे कुठे? शेतकऱ्यांना द्राक्षे वेळेवर देण्याची गडबड असते. मध्यस्थ एखादा भागातीलच असतो याचा पद्धतशीर फायदा हे भामटे उचलतात आणि पळून जातात.

अनेक दलाल वर्षानुवर्षे परिसरात विश्वासाने व्यवसाय करत आहेत. मात्र, त्यांचे शेतकरी आणि कामाची पद्धत ठरलेली असते. याही वर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवातच फसवणुकीच्या दोन घटनांनी झाली आहे. द्राक्ष व्यापाऱ्याला बाग देत असताना किमान त्या दलालाचे नाव पत्ता माहीत असणे, ओळखपत्र पाहिल्याशिवाय व्यवहार न करणे, द्राक्ष वाहतूक करत असलेल्या गाड्यांचे नंबर घेणे, मोबाईलमध्ये शुटींग करणे यापेक्षा महत्त्वाचे जागेवर रोखीने व्यवहार करणे अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनीच दक्षता घेणे गरजेचे...

गेल्या काहीवर्षांपासून द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रबोधन सुरू आहे. दरवर्षी शेतकरी कार्यकर्त्यांकडून तहसीलदार, बाजारसमिती पोलिस यांना निवेदने दिली जातात, दलालांना ओळखपत्र देण्याची मागणी केली जाते. मात्र फसवणूक कायम आहे. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी थेट ग्रामीण भागात जाऊन फसवणूक होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत बैठका घेतल्या होत्या. तरीही शेतकऱ्यांच्या फसवणुका सुरूच आहेत. आता शेतकऱ्यांनीच द्राक्ष व्यवहार करण्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com