(व्हिडिओ) लगट करण्याचे पुरावे कसे द्यायचे?

Demand for immediate action on Tehsildar of Shevgaon
Demand for immediate action on Tehsildar of Shevgaon
Updated on

राहुरी - ""शेवगाव तहसील कार्यालयातर्गंत माझी मुलगी तलाठी म्हणून काम करते. तहसीलदार तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करतात. आक्षेपार्ह वर्तन करतात. याबाबत मी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना यापूर्वीच निवेदन दिले होते. त्यावर त्यांनी "पुरावे द्या' असे सांगितले. लगट करण्याचे पुरावे कसे द्यायचे,'' असा सवाल एका महिला तलाठ्यांच्या वडिलांनी "सकाळ'शी बोलताना उपस्थित केला.

दरम्यान, शेवगावच्या तहसीलदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकरी मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांच्यासह तलाठी, महसूल कर्मचारी संघटनेने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. त्यावर संबंधित तहसीलदारांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री थोरात यांनी दिले. या प्रकरणात विशाखा समितीकडून संबंधित तहसीलदारांची चौकशी सुरू आहे. मात्र, संबंधित तहसीलदारांना सक्‍तीची रजा अथवा बदली केलेली नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवरच सध्या प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याची भावना महिला कर्मचाऱ्यांत आहे. 

राहुरी विद्यापीठात मंत्री थोरातांना निवेदन

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एका कार्यक्रमानिमित्त मंत्री थोरात आले होते. त्यांची भेट घेण्यासाठी संभाजी दहातोंडे व शेवगाव तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांचे पालक शनिवारी (ता.11) सकाळपासूनच तेथे उपस्थित होते. या शिष्टमंडळाने शेवगाव तहसील कार्यालयातील परिस्थितीची माहिती देऊन महसूलमंत्र्यांना निवेदन दिले. त्यांच्याशी चर्चा केली. शेवगाव तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर महिला अन्याय, अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दहातोंडे यांनी निवेदनात केली आहे. 

कर्मचाऱ्यांवर दबाव आणू शकतात 

जिल्हास्तरीय विशाखा समितीद्वारे शेवगाव तहसीलदारांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे तहसीलदार तक्रारदार महिला कर्मचाऱ्यांवर दबाव आणू शकतात, तसा प्रयत्न त्यांनी यापूर्वीही केलेला आहे. त्यामुळे चौकशी काळात तहसीलदारांचे निलंबन करावे, अशी मागणी तलाठी संघटनेच्या निवेदनात केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Muslim community prayer in Sangli
son dies after mother death in nipani
Marathi News Esakal
www.esakal.com