बेळगावकरांना 'या' कारणासाठी करावी लागते हुबळीवारी

सतीश जाधव
Monday, 10 August 2020

परराष्ट्र मंत्रालयाकडून सूचना आल्यानंतर कार्यालय सुरु 

बेळगाव : कोरोनामुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून बेळगाव शहरातील पासपोर्ट कार्यालय बंदच आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून सूचना आल्यानंतर सदरचे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालय बंद असल्याने शहरवासीयांना हुुबळीला जाऊन पासपोर्ट तयार करुन घ्यावा लागत आहे. यामुळे वेळ आणि आर्थिकता अशा दोन्हींचा भार पडत आहे. यामुळे खबरदारी घेऊन पासपोर्ट कार्यालय सुरु करावे अशी मागणी होत आहे.

हेही वाचा - बेळगावात भाच्यावर मामाने गोळीबार करताच तो  झाला पशार अन्....

बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन 14 फेब्रुवारी 2018 या वर्षी बेळगावातील मुख्य डाक कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आले. कार्यालयात रोज 50 पेक्षा अधिक जणांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते . मात्र, कोरोनामुळे देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेव्हापासून पासपोर्ट कार्यालय बंदच आहे. पासपोर्ट काढण्यासाठी शहरवासियांना हुुबळीवारी करावी लागत आहे. 

बेळगावातील पासपोर्ट कार्यालय लहान असल्याने या ठिाकणी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच पासपोर्ट करताना बायोमॅट्रीक गरजेचे असते. यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील काही मोजकीच पासपोर्ट कार्यालये सुरु आहेत. कोरोनामुळे सध्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असली तरी भविष्यात विदेशवारी करण्यासाठी पासपोर्ट काढला जात आहे. मात्र, बेळगावातील कार्यालया बंद असल्याने अडचणी येत आहेत. 

हेही वाचा -  सावली केंद्र कोरोनामुक्त; 63 लोकांनी केली शांतपणे मात...

''बेळगावातील पासपोर्ट कार्यालय सध्या बंदच आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑफीस सुरु करण्यासाठी कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. सूचना आल्यानंतर कार्यालय सुरु करण्यात येईल." 

-कावेरी पाटील, इनचार्ज, पासपोर्ट कार्यालय 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of passport office will start in belgaum