कागवाडला होणार 'एपीएमसी' ; उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची घोषणा

कागवाड तालुका झाल्याने येथे कृषी उत्पन्न बाजार समिती गरजेची
Laxman Savadi
Laxman SavadiEsakal
Updated on

उगार खुर्द : कागवाड (Kagwad)तालुका निर्मिती होऊन चार वर्षे झाली आहेत. येथे न्यायालय व शासकीय कार्यालये होत आहेत. त्याप्रमाणे आमदार श्रीमंत पाटील यांना सोबत घेऊन कागवाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची (एपीएमसी) स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi)यांनी केली.

Laxman Savadi
कर्नाटक राज्याचा कोण होणार मुख्यमंत्री?

कागवाड येथे ८० लाख रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या १४ व्यापारी संकुल गाळ्यांचे उदघाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अथणी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील तर व्यासपीठावर एपीएमसी सदस्य रवींद्र पुजारी, गटीबाळाप्पा गुड्डापूर, लक्ष्मण मुगळखोड, शिवानंद मगदूम, विठ्ठल पवार, अनिल कोडणी होते.

सध्या अथणी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या समितीचे संचालक कागवाड तालुक्यात आहेत.त्यांना अथणीस जावे लागते कागवाड तालुका झाल्याने येथे कृषी उत्पन्न बाजार समिती गरजेची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होऊन विकास होण्यास मदत होणार आहेत. त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com