महाबळेश्वर : नीलम नारायण राणेंसह तीस मिळकतधारकांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

महाबळेश्वर तालुक्यातील तुम्ही केलेल्या क्षेत्रामध्ये विनापरवाना बांधकामाच्या अनुषंगाने समर्थनिय पुरावे कार्यालयास सादर करावेत, अन्यथा राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार वनसदृश्य, इकोसेन्सेटिव्ह झोनमधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

सातारा : राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशावरून इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रात विनापरवाना अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणेंसह तीस मिळकतधारकांना वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगले यांनी नोटीस बजावली आहे. संबंधितांना अनधिकृत बांधकामाबाबत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

महाबळेश्वर येथील इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रात विनापरवाना मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. ही सर्व बांधकामे अनधिकृत आहेत. ही बांधकामे ताबडतोब काढावीत असा आदेश जिल्हाधिकारी व वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशा प्रकारच्या याचिका राष्ट्रीय हरीत लवाद नवी दिल्लीच्या न्यायालयात २०१५ करण्यात आला होत्या. त्याबाबत सुनावणी होऊन हरीत लवादाने 3 डिसेंबर २०१९ रोजी आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.

हेही वाचा -  सातारा : बोधेवाडी घाटात खून ? जळालेल्या वाहनासह आढळला मृतदेह

महाबळेश्वर तालुक्यातील तुम्ही केलेल्या क्षेत्रामध्ये विनापरवाना बांधकामाच्या अनुषंगाने समर्थनिय पुरावे कार्यालयास सादर करावेत, अन्यथा राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार वनसदृश्य, इकोसेन्सेटिव्ह झोनमधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

ही नाेटीस नीलम नारायण राणे (क्षेत्र महाबळेश्वर), प्रहाद नारायणदास राठी, मोशा बाबूलाल पांचाळ (क्षेत्र महाबळेश्वर),खुर्शिद इस्माई अन्सारी खिंगर, ता. महाबळेश्वर), सदानंद माधव करंदीकर खिंगर), शिरीष मधुसूदन खेर, (खिंगर), विकुल बाबू दुधाणे, संग्रामसिंह अप्पासाहेब नलवडे (भेकवली), मनीषा संतोष शेडगे (शिंदोळा), गीताश्री अशोक भोसले (कुंभरोशी), संतोष हरिभाऊ जाधव (कुंभरोशी), मनोहर रामचंद्र शिंदे (कुंभरोशी), शंकरलाल बचुभाई भानुशाली(दुधोशी), आसावरी संजीव दातार (दरे), विठ्ठल दगडू गोळे, शांताराम परखती गोळे (भोसे) केशव धोंडिजा गोळे (भोसे), राजन भालचंद्र पाटील (मेटतळे), भोलू लेखराज खोसला (मेटतळे), आरची डॅनियन डिसुझा (मेटतळे), कुसूम प्रताप ओसवाल (मेटतळे भोसे), चंद्रशेखर चद्रकात साबणे (मेटतळे), संदीप नंदकुमार साळवी (मेटतळे), रक्षक अतुल चिंतामणी साळवी (मेटतळे), खेमजी नानजी पटेल (मेटतळे), आरची डॅनियन पटेल (मेटतळे) पूजा गजानन पाटील, आनंदा राय कांबळे, आरची डॅनियन डिसुझा (मेटतळे) यांना बजावण्यात आली आहे.

नक्की वाचा - भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Collector Issued Notice To Neelam Narayan Rane For Unauthorized Construction In Mahabaleshwar