बंदोबस्तासाठी पत्नी, चिमुकलीसह पोलिस उपाधीक्षक रस्त्यावर 

Deputy Superintendent of Police Manoj Kumar Naik
Deputy Superintendent of Police Manoj Kumar Naik

निपाणी : देशात थैमान घालणाऱ्या कोरुनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि पोलिस कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा देशसेवेला प्रथम प्राधान्य देत चिकोडी येथील पोलिस उपाआधीक्षक मनोज कुमार नायक यांनी रात्रीच्या वेळी दुचाकीवरून पत्नी, चिमुकलीसह चिकोडीहून निपाणी येथे येऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या अनोख्या कर्तव्याचे निपाणी आणि परिसरातून कौतुक होत आहे.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आणि चिकोडी तालुक्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी  पोलिस आणि आरोग्य यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे . कोरोनाचे रुग्ण आढळू नयेत यासाठी आरोग्य ठाण्यासह चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक मनोज कुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात चोख बंदोबस्त ठेवला असून लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आतापर्यंत या विभागात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. 

सोशल डिस्टन्सिग आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पोलीस आपले कर्तव्य निभावत आहेत. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी हे दोन मुख्य घटक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनाला रोखायचे असेल तर सोशल डिस्टन्सिग आणि बाधित रुग्णावर तातडीने उपचार होणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलिसांना तर १२ ते १४ तास ड्यूटी करावी लागत आहे. आपले आरोग्य आणि कुटुंबाची पर्वा न करता पोलीस सध्या रस्त्यावर आणि चौकाचौकात दिवस-रात्र ठाण मांडून आहेत. लॉकडाऊमुळे  राजकीय नेतेमंडळी आणि नागरिक घरीच असले तरी चिकोडीचे पोलीस उपाअधिक्षक मनोजकुमार नायक यांनी रविवारी(ता.१२) रात्री चक्क चिक्कोडीहून दुचाकीवरून पत्नी आणि चिमुकली सह निपाणी येथे येऊन रात्री उशिरापर्यंत आपले कर्तव्य बजावले. यावरूनच त्यांची देशसेवेचे भावना दिसून येते. त्यांनी केलेल्या कर्तव्यमुळे निपाणी परिसरातील नागरिक मात्र अवाक झाले होते. आतापर्यंत लॉक डाउनच्या काळात बऱ्याचदा निपाणी शहराला भेट देऊन जनजागृती सह विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यांच्यासोबतच मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्य नायक, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हाडकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी.जी. सुब्बापुरमठ, सहाय्यक उपनिरीक्षक एम.जी. निलाखे व त्यांचे सहकारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरीच राहून त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.अशा या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना शहरवासीयांच्या सलाम!

मांडल पोलीस निरीक्षकांचा दुचाकीवरून बंदोबस्त

लाॅकडाऊनच्या काळात सायरन वाजून पोलीस येत असतात त्यामुळे अनेक जण आवाज येतात घरी जातात. पण येथील मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक हे दिवसभर दुचाकी वरूनच शहरात सर्वत्र फेरफटका मारत आपले कर्तव्य बजावत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com