
सांगली : कोरोना पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीचा भूगोल पेपर रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. रद्द झालेल्या भूगोल पेपरची राखण करण्यासाठी सांगलीतील दोन केंद्रावर वीस पोलिस कडक बंदोबस्त देत आहेत. राज्यभरातील 35 हून अधिक ठिकाणी असाच बंदोबस्त देण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्याशिवाय हे पेपर एका ठिकाणी किंवा बोर्डालाही पाठवता येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या राज्यातील परिस्थितीची आढावा पोलिस आणि परीक्षा मंडळाने घेतल्यास किती पोलिस अनावश्यक बंदोबस्तात आहेत, याची अंदाज घेता येईल.
त्याचे झाले असे की, सांगलीचे पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांच्या ही बाब लक्षात आली. सांगलीतील दोन केंद्रांवर दहावीच्या भूगोल पेपरसाठी तसेच जमा केलेल्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठवण्यापूर्वी सांगली हायस्कूल व गुजराती हायस्कूल येथील दोन केंद्रांवर दहा पोलिसांचा कायमचा बंदोबस्त आहे. 22 मार्चला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर एक पेपर घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. दरम्यान राज्य सरकारच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड लॉकडाईन संपल्यानंतर परीक्षा घ्यावयाची की नाही याचा विचार करीत होत्या. अखेर दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यापूर्वीच शिक्षण मंत्री गायकवाड यांनी पेपर रद्द झाल्याचे जाहीर केले.
भूगोलचा पेपर रद्द झाला. त्या विषयाची प्रश्नपत्रिका कंस्टोडियममध्ये ठेवलेल्या असतात. त्यासाठी दहा पोलिस बंदोबस्तात अडकले आहेत. देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस कमी पडताहेत. ही बाब सांगली पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांच्याशी संपर्क साधला. त्यावर शिक्षणाधिकारी तेलंग कोल्हापूर परीक्षा महामंडळाच्या अध्यक्षांशी संपर्क साधला. एकाच केंद्रावर त्या भूगोलच्या प्रश्नपत्रिका ठेवाव्यात, अशी सूचना पोलिसांनी केली होती. मात्र लॉकडाऊन संपल्याशिवाय काहीही करता येणार नसल्याचे परीक्षा मंडळाकडून सांगण्यात आले. तरीही एका ठिकाणी प्रश्नपत्रिकांसाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. राज्यातील परिस्थितीचा विचार केल्यास किमान एक हजार पोलिस भूगोलच्या प्रश्नपत्रिका राखण्याच्या बंदोबस्तावर असेल, अशी चर्चा आहे.
काय करता येतेय, हे पाहतो आहे
परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तपासणीला पाठवण्यापर्यंत कंस्टोडियमच्या ठिकाणी बंदोबस्त असतो. याबाबत आज पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला. मीही परीक्षा महामंडळाशी संपर्क साधला आहे. माझ्या माहितीप्रमाणे दोन केंद्रांवर भूगोलच्या प्रश्नपत्रिका असू शकतात. तरीही काय करता येतेय, हे पाहतो आहे.'
- सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सांगली.
परीक्षा मंडळाच्या निर्णयाकडे आमचे लक्ष
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दहावीच्या बोर्डाकडे पोलिस बंदोबस्त आहे. याबाबत मी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे. दोन केंद्राऐवजी एका ठिकाणी त्यांचे साहित्य ठेवले तरीही काही पोलिस बंदोबस्तासाठी मिळू शकतात. परीक्षा मंडळाच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे.
- अशोक विरकर, पोलिस उपाधिक्षक, सांगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.