नामविस्तार की मुख्यमंत्र्यांचा अभिनंदन सोहळा?

तात्या लांडगे
बुधवार, 6 मार्च 2019

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचे किमान 50 ते 60 वेळा अभिनंदन केले. मात्र, उपस्थित धनगर समाजाच्या तरुणांनी आरक्षणाचे बोला अशी घोषणाबाजी केली. तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भाषणावेळी उपस्थितांनी त्यांच्याविरुध्द घोषणाबाजी करीत भाषण रोखण्याचाही प्रयत्न केला. 

नामविस्तारावेळी उपस्थित मान्यवरांकडून सरकारचे गुणगान सुरु असताना उपस्थितांनी आरक्षणावर बोला अशी मागणी केली. त्यावेळी सरकार आरक्षणाचीही मागणी पूर्ण करेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अध्यक्षीय भाषणासाठी सहकारमंत्री बोलत असताना उपस्थितांनी खोटे बोलू नका, तुमच्याकडे मागणी करुनही नामविस्ता व आरक्षणासाठी तुम्ही पत्र दिले नाही, असे म्हणत घोषणाबाजी केली. 

पालकमंत्री देशमुखांची नामविस्ताराला दांडी 
सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वरांचे नाव द्यावे, विमानतळ अथवा रेल्वे स्थानकाला महात्मा बसवेश्‍वरांचे नाव द्यावे अशी मागणी लिंगायत समाजाने सरकारकडे केली होती. परंतु, सरकारने लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत धनगर समाजाच्या मागणीनुसार सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील नाराज झालेल्या लिंगायत समाजबांधवांचा आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसेल याचा अंदाज घेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी नामविस्ताराच्या सोहळ्याला आवर्जुन दांडी मारल्याची चर्चा होती. 

मुख्यमंत्र्यांची जाणिवपूर्वक अनुपस्थिती 
सत्ता मिळाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही पूर्ण केले नाही. दुसरीकडे कायदेशीर चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करुनही आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच वस्तीगृह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे कर्जवाटप, मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेणे आदी मागण्याही कमी-अधिक प्रमाणात अपूर्णच राहिल्या आहेत. लिंगायत समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्याही पूर्ण झाल्या नाहीत. राज्यातील नाराज झालेल्या धनगर समाजाला विद्यापीठ नामविस्तारातून जवळ करण्याचा प्रयत्न सरकारने केला. दरम्यान, याचे श्रेय्य मुख्यमंत्र्यांना घेण्याची नामी संधी असतानाही त्यांनी या सोहळ्याला अनुपस्थितीत दर्शविली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis and Subhash Deshmukh criticized by Dhangar Community