
बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला त्यावेळी सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेथे हजर होते. मी त्याची साक्षीदार आहे.
फडणवीसांच्या साक्षीला बापटांच्या विहीणबाई!
सांगली - बाबरीचा (Babri Masjid) वादग्रस्त ढाचा पाडला त्यावेळी सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तेथे हजर होते. मी त्याची साक्षीदार (Witness) आहे. माझ्यासोबत अनेक सांगलीकर कारसेवक त्याचे साक्षीदार आहेत, असे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर (Neeta Kelkar) यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले. माजी मंत्री गिरीष बापट यांच्या विहीणबाईंनी फडणवीसांची साक्ष दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडायला मी गेलो होतो, असे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘ते खोटं बोलत आहेत’, अशी टीका केली होती. त्याला केळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे, की बाबरी ढाचा पडताना देशातून आबाल वृद्ध आयोध्या नगरीत होते. तीस वर्षापूर्वी लाखो कारसेवक ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत शरयू नदीकाठी जमले होते. सतरा, अठरा वर्षाच्या कोठारी बंधूंचे बलिदान जयंतरावांना आठवत नसेल. त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या करिअरची चिंता केली असती तर त्यांना कारसेवेला पाठवलं नसतं.
आमची अस्मिता ज्यांना आठवत नाही ते बाबराचे वंशज असावेत. धर्माभिमान मोदींनी जगाला शिकवला. जगात कर्तृत्ववान आणि खंबीर कणखर पंतप्रधान बनले. महागाई आणि गरिबीवर राज्यातील मंत्र्यांनी बोलू नये. मुख्यमंत्र्यांना सांगूनही अजून पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केले नाहीत. मंत्री तुरुंगात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्य अंधकारात आहे. यावर जयंतरावांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी गप्पा माराव्यात. तुमच्या सरकारचा तिहेरी ढाचा देवेंद्रजींच्या हातूनच पडणार आहे.
Web Title: Devendra Fadnavis Babri Masjid Neeta Kelkar Witness Bjp Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..