कडेगावात धडक मोहीम; 50 जणांकडून 10 हजार दंड वसूल 

संतोष कणसे 
Saturday, 25 July 2020

कडेगाव : शहरात विनामास्क, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या तसेच उघड्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायतीतर्फे कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे.

कडेगाव : शहरात विनामास्क, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या तसेच उघड्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायतीतर्फे कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रस्त्यावर उतरले आहे. पथकाने 50 जणांवर दंडात्मक कारवाई करीत 10 हजार 900 इतका दंड वसूल केला. 

शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनासह नगरपंचायत प्रशासनानेही कंबर कसली आहे. शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, रस्त्यावर थुंकू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा नीता देसाई व मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी केले आहे. तरीही काही नागरिक विनामास्क फिरत आहेत.

तसेच, इतर नियमांचेही उल्लंघन करीत असताना दिसून आल्यावर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. या कारवाई वेळी कडेगाव नगरपंचायतीने नियमांचे उल्लंघन 50 जणांकडून एकूण 10 हजार 900 इतका दंड वसूल केला. या वेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, कर व प्रशासकीय अधिकारी वर्षा पाटील, महेश मिरजकर, मुनीर पिरजादे, सदानंद दोडके, शरद मिसाळ, शिवाजी अब्दागिरे, अक्षय पिसाळ, दिगंबर तेवरे, मंगेश माळी, महेश माळी, बंटी देशमुख उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhadak campaign in Kadegaon; 10 thousand fines