लोकांचे जीवन समृद्ध करणारा तथागत बुद्धांचा धम्म

धर्मवीर पाटील
Monday, 25 January 2021

इस्लामपूर :"सामान्य लोकांचे जीवन समृद्ध करणारा तथागत बुद्धांचा धम्म आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतिमान होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तक्षशीला बौध्द विहार हे विचारांचे, ज्ञानचे मोठे केंद्र बनेल, असे मत बौध्द अभ्यासक भंते दीपांकर यांनी व्यक्त केले. 

येथील तक्षशीला ज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित बौध्द धम्म उपासक उपासिका मेळाव्यात बोलत होते. प्रकाश कांबळे अध्यक्षस्थानी होते. जितेंद्र व भरती भिलवडीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बोधी वृक्षाचे पूजन करण्यात आले. 

यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तेजस शिंदे, चित्रकला स्पर्धेत नाविण्यप्राप्त चेतन भोसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवल्याबद्दल ऋतुजा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. महेश बनसोडे, प्रा. डॉ कैलाश सोनवणे, डॉ. क्रांती सावंत, डॉ. जितेंद्र लादे यांचाही गौरव करण्यात आला. राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील,शामराव आळतेकर,अशोक कांबळे,अरविंद कांबळे, प्रा. नितीन शिंदे उपस्थित होते. 

संजय बनसोडे यांनी स्वागत केले. नीलिमा कांबळे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे यांनी सूत्रसंचालन केले. अवधूत कांबळे, योगेश कुदळे, सचिन कांबळे, अतुल जगताप, कुबेर कांबळे, मनीषा भोसले आदींनी संयोजन केले.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhamma of Tathagata Buddha who enriches people's lives