पर्यटनाला जाताय...हे नक्की बघा

Dhamod Dam Tourism : Belgaon Marathi News
Dhamod Dam Tourism : Belgaon Marathi News

धामोड (बेऴगाव) :  कोल्हापूर शहरापासून अवघ्या 40 किलोमीटरच्या अंतरावर असणारे निसर्गसंपन्न शांत तुळशी जलाशयाच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, गावातील प्राचीन मंदिरे , मनमोहक डोंगर , केळोशी खुर्द येथील वनराई , ऐतिहासिक किलचा येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. या स्थळांना पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज आहे . तसे झाल्यास हे गाव पर्यटनाच्या नकाशावर येऊ शकेल.

1965 चे बांधकाम 

तालुक्याच्या पश्चिम भागात 1965 झाली तुळशी धरणाचा पाया घालण्यात आला . 1978 साली तुळशी धरण पूर्णत्वाला गेले. यामुळे .अगदी डोंगराळ दुर्गम वाड्या-वस्त्या ने असलेले हे गावात उसाचे मळे डोलू लागले . आर्थिक सुबत्ता नांदू लागली. गेल्या दहा वर्षात येथील तुळशी जलाशयाची ओळख जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचा पिकनिक पॉईंट अशी झाली. तुळशी धरणावरून दिसणारे सनसेट ,समोरचा ऐतिहासिक किलचा, तुळशीच्या तुळशी जलाशयाच्या शेजारीच केळोशीच्या ज्योतिर्लिंग देवालयाचे मंदिर, तलावाच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदिर अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखे आहेत. त्याचबरोबर तुळशीला वरदायी ठरलेला केळोशी बुद्रुकचा लोंढा नाला पर्यटकांना आकर्षित करत आहे.

 सह्याद्रीच्या डोंगररांगाचा घ्या आनंद

जिल्ह्याला सह्याद्रीच्या डोंगररांगांचे वरदान लाभले आहे. इथे कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे डोंगररांगातून अनेक नद्या उगम पावल्या आहेत. सह्याद्री डोंगर माथ्यावरून तुळशी नदी चा उगम झाला आहे . येथील निसर्ग रम्य परिसर, थंड हवा, डोंगर, दऱ्यामधून भ्रमंती, वनराईने नटलेला परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे. रविवारी तुळशी पर्यटकांनी हाऊसफुल असतो. सध्या येथे शाळेच्या पिकनिक व सहल यांनी हा परिसर गजबजून गेला आहे . मात्र याठिकाणी लोकप्रतिनिधींची मोठ्या अनास्था आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास येथे पर्यटनाचा दर्जा मिळण्यास वाव आहे. परंतु याकडे गेल्या सात-आठ वर्षांपासून दुर्लक्ष केले जाते आहे. येथे पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास रोजगाराच्या संधी याठिकाणी उपलब्ध होऊ शकतात.

 लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे
तुळशी हे निसर्गरम्य ठिकाणे आहे . येथे सतत पर्यटकांची रेलचेल असते . सातत्याने शांत निरव अशी या तुळशीची ओळख आहे. तुळशी पर्यटनाच्या नकाशा वरती येण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
दीपक भामटेकर धामोड स्थानिक नागरिक

पर्यटनासाठी पाठपुरावा सुरू

तुळशी जलाशयाचा परिसर सातत्याने पर्यटकांना आकर्षित करतो. यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. शासन दरबारी पर्यटनासाठी पाठपुरावा सुरू आहे.
विनय पाटील जिल्हा परिषद सदस्य  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com