
शांताराम पाटील
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीत राहण्यावरून मतभेद आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी जयंत पाटील गटाचे सूर कधी जुळलेच नाहीत. त्यामुळे या काँग्रेस गटाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका राहणार, याबाबत उत्सुकता आहे.