अवघड झाले...महाराष्ट्र एक्‍स्प्रेसचा स्लिपर कोच रद्द

Maharashtra-Express
Maharashtra-Express
सोलापूर : नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वे विभागाने महत्त्वपूर्ण बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टणम एक्‍स्प्रेसला आता गाणगापूर स्थानकावर एक मिनिटाचा थांबा दिला जाणार आहे. तर कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला जोडला जाणारा स्लिपर कोच रद्द करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.


हेही आवश्‍य वाचाच...चला पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे


गाणगापूर रोड स्थानकांवरील प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टणम एक्‍स्प्रेसला एक मिनिटाचा थांबा दिला जाणार आहे. 27 डिसेंबर ते 8 मार्च या कालावधीपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या निर्णयात बदल केला जाणार आहे. दुपारी 3.45 वाजता ही रेल्वे गाणगापूर रेल्वे स्थानकावर येणार असून तिथून 3.46 वाजता रवाना होणार आहे. तर 1 ते 31 जानेवारीपर्यंत सोलापूर-नागपूर स्लिपर कोच रद्द करण्यात आला आहे. चेन्नईहून दररोज येणाऱ्या चेन्नई मेल एक्‍स्प्रेसला सोलापूर रेल्वे स्थानकावर सोलापूर-नागपूर स्लिपर कोच जोडला जातो. हा कोच दौंड स्थानकावर गेल्यानंतर कोल्हापूर- नागपूर या महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला जोडला जातो. दरम्यान, 1 ते 31 डिसेंबरपर्यंत हा कोच रद्द करण्यात आला होता मात्र, आता जानेवारीपर्यंत हा निर्णय जैसे थेच ठेवला जाणार आहे. तर नागरकोईल-मुंबई-नागरकोईल एक्‍स्प्रेसचा एलएचबी कोचमध्ये कायमस्वरूपी बदल करण्याचाही निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नॉन इंटरलॉकिंग, दुहेरीकरणाचे अर्धवट काम अशा अडथळ्यांची शर्यत पार करता असताना अनेक आरक्षित प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागले आहे. आता स्लिपर कोच रद्द व नागरकोईल-मुंबई-नागरकोईल एक्‍स्प्रेसच्या कोचमध्ये कायस्वरुपी बदल केल्याने रेल्वे प्रवाशांमधून ओरड येत आहे.


हेही आवश्‍य वाचाच...राज्यपाल म्हणाले...मराठी समजते पण बोलता येत नसल्याची खंत
 
  • नागरकोईल-मुंबई-नागरकोईल एक्‍स्प्रेसमधील बदल
  • नागरकोईल-मुंबई एक्‍स्प्रेस रेल्वेला पूर्वी 22 कोच होते आता 20 कोच असणार
  • दोन लगेज कम जनरेटर कार (ब्रेक) अन्‌ 10 स्लिपर कोच राहणार
  • चार थ्री एसी तर एक टू एसी टिएरसहित धावणार नागरकोईल एक्‍स्प्रेस
  • दोन जनरल अन्‌ एक पॅन्ट्रीकारही असणार : दोन जनरल कोच केले कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com