दिग्विजय सूर्यवंशी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

सांगली- कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दिग्विजय सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीसाठी साडेअकराला मतदान प्रक्रिया सुरु झाली. भाजपकडून धीरज सूर्यवंशी व गजानन मगदुम यांना महापौर उपमहापौरदासाठी याआधीच उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पंधरा मिनिटाच्या अवधीत अर्जमाघारीचा निर्णय झाला. त्यावेळी सूर्यवंशी यांचा अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय झाला. त्यांच्यासाठी मैन्नुद्दीन बागवान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कॉंग्रेसच्या उत्तम साखळकर यांनीही माघार घेतली. 

गेले चार दिवस रंगलेला सदस्यांच्या फुटीचा, उमेदवारीचा सस्पेन्स आता काही मिनिटात संपणार आहे. सत्ताधारी भाजपमधील सात सदस्य नॉटरिचेबल, नगरसेवकांची नाराजी; शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील महापौरपदाच्या उमेदवारी या साऱ्याचा घोळ आज सकाळपर्यंत कायम राहिला. महापौरपदासाठीचा आघाडीचा उमेदवार कॉंग्रेसचा की राष्ट्रवादीचा याबाबतचा सस्पेन्सही शेवटपर्यंत आज कायम होता. भाजपकडे 42 जणांचे बहुमत आहे. मात्र त्यांची जुळणी आत्तापर्यंत 36 जणांची निश्‍चित झाली आहे. 37 चा आकडाही बहुतमासाठी पुरेसा आहे. दोन सहयोगी सदस्यांपैकी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मगदुम आहेत. तर विजय घाडगे भाजपसाठी अद्यापही नॉटरिचेबल आहेत. भाजपचे नॉटरिचेबल अन्य चार सदस्य मिरजेचे असल्याची चर्चा आहे. नॉटरिचेबल सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आमचाच महापौर होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. दुसऱ्या बाजूने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपचे नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात असून, महापालिकेत सत्तांतर होऊन आमचा महापौर, उपमहापौर होईल असा दावा केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digvijay Suryavanshi Congress front candidate