दीपोत्सवाला प्रारंभ...कोरोनाचे सावट असूनही उत्साह कायम

अजित कुलकर्णी 
Friday, 13 November 2020

वसुबारस...अर्थात दिवाळीचा पहिला दिवस. प्राणीमात्रांविषयी ममत्व व कृतज्ञतेची भावना व्यक्‍त करण्याचा क्षण. आश्‍विन वद्य व्दादशीला दरवर्षी हा दिवस येतो. यंदा कोरोनाचे सावट असूनही उत्साह कायम आहे. पांजरपोळमधील गो शाळेत सकाळपासून रात्रीपर्यंत पूजेसाठी गर्दी होती. 

सांगली : वसुबारस...अर्थात दिवाळीचा पहिला दिवस. प्राणीमात्रांविषयी ममत्व व कृतज्ञतेची भावना व्यक्‍त करण्याचा क्षण. आश्‍विन वद्य व्दादशीला दरवर्षी हा दिवस येतो. यंदा कोरोनाचे सावट असूनही उत्साह कायम आहे. पांजरपोळमधील गो शाळेत सकाळपासून रात्रीपर्यंत पूजेसाठी गर्दी होती. 

महिलांसह पुरुषांनीही भाग घेत प्रार्थना केली. दरम्यान, शुभेच्छासाठी सोशल मीडियावर धूम होती. व्दिशतकमहोत्सव पार केलेल्या पांजरपोळ संस्थेमध्ये गायींना चारा, केळीसह पदार्थ देण्यासाठी गर्दी होती. गो शाळेत 50 गायी आहेत. शहर, उपनगरातील महिलांनी हजेरी लावून गायींचे औक्षण केले. मनोभावे पूजा केली. नैवेद्यही अर्पण केला. 

अल्प दरात चाऱ्याची सोय केली होती. भाविकांनी गायींना चारा खाऊ घातला. गोवत्स व्दादशीनिमित्त महिलांचा उपवास होता. सायंकाळी गायींना ओवाळून महिलांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. दरम्यान, शहर परिसरातील गो शाळेत व गोठ्यांवरही वसूबारस उत्साहात झाले. उद्योजक रौनक शहा यांच्या बुधगाव येथील गो शाळेत पारंपारिक पध्दतीने गो मातेचे पूजन खेले. दिवसभर गो पूजनासाठी महिलांची वर्दळ होती. सायंकाळी शहा परिवारातर्फे गायींना फळे, गोग्रास, गोडधोड नैवेद्य देण्यात आला. 

आज धनत्रयोदशी, वहीपूजन 
निज अश्‍विन कृष्ण त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशी उद्या (ता. 13) आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. वह्या पूजनाची प्रथा आहे. वहीपूजनाचा मुहुर्त तीन सत्रात आहे. सकाळी 8. 10 पासून ते 10.49 मिनिटांपर्यंत, दुपारी 12.23 पासून ते 1.38 मिनिटांपर्यंत तर सायंकाळी 4.42 पासून ते 6.8 मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. सायंकाळी घराबाहेर दिवा लावून यमदीपदान केले जाते. राष्ट्रीय आयुर्वेद दिवस धनतेरस नावानेही ओळखला जातो.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipotsavala begins ... despite Corona's demise