

पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीतच एकमत नसल्याचे उघड झाले आहे. भाजपने शरद लाड यांना उमेदवार घोषित केले.
esakal
BJP Candidate Pune Constituency : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शरद लाड हेच असतील, अशी अनौपचारिक घोषणा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पलूस येथे आयोजित भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शरद लाड यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे वडील आमदार अरुण लाड हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. आजही ते त्याच पक्षात आहेत.