पाठ्यपुस्तक रचना समितीचा कार्यकाळ समाप्त झाल्याने समिती बरखास्त; सी. एन. अश्वतनारायण

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त बेळगावात आलेले मंत्री अश्वतनारायण यांनी आज (ता. ४) पत्रकारांशी संवाद साधला
C N Ashwatnarayan belgaum
C N Ashwatnarayan belgaumsakal
Updated on

बेळगाव : पाठ्यपुस्तक रचना समितीचा कार्यकाळ समाप्त झाल्यानेच ही समिती विसर्जित करण्यात आलेली आहे. ही समिती बरखास्त केलेली नाही. त्यामुळे याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण उच्च शिक्षण मंत्री सी. एन. अश्वतनारायण यांनी दिले. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त बेळगावात आलेले मंत्री अश्वतनारायण यांनी आज (ता. ४) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जी पाठ्यपुस्तक रचना समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी आपला अहवाल सरकारला दिला असून त्यांची मुदत संपल्यानेच ती विसर्जित झाली.

पाठ्यपुस्तक निर्मिती करताना कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास तसेच कोणाचा आक्षेप असल्यास तो शासनाकडे मांडला जाऊ शकतो. जनतेला विश्‍वासात घेऊनच शासनाचे काम सुरू आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीबाबत जे कुणी द्वेषभावना निर्माण करीत आहेत, अशा समाजकंटकांवर कारवाई केली जाईल. याबाबत पोलिस आणि सायबर क्राईमला सूचना करण्यात आली आहे. पुस्तकात सर्वसमावेशकता ठेवली जात आहे.

यावेळी पाठ्यपुस्तक‌ निर्मितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे का? असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आपण सर्वजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच स्वयंसेवक आहोत. संघाने आजवर देश जोडण्याचे कार्य केले आहे. संघ नेहमी सर्वाना एकत्र आणण्याचे काम करते. त्यामुळे हा प्रश्न निरर्थक आहे. पाठ्यपुस्तकाशी‌ संबंधित सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. पाठ्यपुस्तकात कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असेही मंत्री अश्वतनारायण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com