
Crime News Sangli : घराकडे जाण्याच्या रस्त्यावर पत्र्याचे शेड मारू नको, असे सांगण्यास गेलेल्या तरुणाचा लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीवर वार करून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाबू ऊर्फ हिरोल रामचंद्र मल्लाळकर (वय २७, रा. अचकनहळ्ळी, ता. जत) असे मृत तरुणाचे नाव असून, सोमवारी (ता.२) रात्री ही घटना घडली आहे. जत पोलिस ठाण्यात मृताची आई सावित्री रामचंद्र मल्लाळकर (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे.