esakal | जिल्हा बॅंकेची रणधुमाळी दिवाळीत? प्रारूप मतदार यादीतील हरकतींवर उद्या सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg

प्रारूप मतदार यादीवर नोंदवलेल्या हरकतींवर १५ रोजी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे.

जिल्हा बॅंकेची रणधुमाळी दिवाळीत?

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर ५० हरकती दाखल झाल्या आहेत. बुधवारी (१५) सुनावणी होणार असून, २२ रोजी निकाल दिला जाईल, तर २७ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी विभागीय सह निबंधक कोल्हापूर यांनी १३ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. जिल्हा बॅंकेच्या प्रारूप यादीत २५७३ मतदार सभासद आहेत. यात २२१९ संस्था सभासद आहेत. प्रारूप यादीवर हरकती दाखल करण्यासाठी १३ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. मुदतीत ५० हरकती दाखल झाल्या आहेत. सभासद मृत झाल्याबाबत २६ यादीत नाव नसल्याच्या १२ तर सभासदांने राजीनामा दिल्याची एक तक्रार आहे. तसेच प्रतिनिधीच्या नावावर आक्षेप असल्याच्या चार व इतर सात हरकतीही आहेत.

हेही वाचा: 'राणे, राऊत नाहक वक्तव्य करुन जनतेची दिशाभूल करताहेत'

प्रारूप मतदार यादीवर नोंदवलेल्या हरकतींवर १५ रोजी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे. यासाठी संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. सुनावणी झाल्यानंतर २२ पर्यंत हरकतींवर निकाल दिला जाणार आहे, तर २७ रोजी बॅँकेची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. अंतिम मतदार यादीनंतर दहा दिवसांत बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत बँकेच्या निवडणुकीचा धुरळा उडेल, अशी शक्यता आहे.

loading image
go to top