राजकीय वातावरण तापणार? निवडणूक रिंगणात महाविकास-भाजप आमनेसामने

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
NCP-BJP-Shivsena
NCP-BJP-Shivsenagoogle
Summary

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.

सांगली - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात लढत निश्चित झाली आहे. भाजपचे खासदार व विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

विद्यमान 21 पैकी बी. के. पाटील, झुंझारराव शिंदे, उदयसिंह देशमुख या तीन संचालकांनी अर्ज भरला नाही. तर खासदार पाटील यांच्यासह सिकंदर जमादार, श्रध्दा चरापले, कमल पाटील, चंद्रकांत हाक्के, गणपती सगरे या सहाजणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे विद्यमान नऊ संचालक निवडणूक रिंगणात नाहीत. 21 जागांच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. 316 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी आज गर्दी झाली होती. अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले. त्यामुळे 18 जागांवर निवडणूक लागली आहे.

NCP-BJP-Shivsena
करेक्ट कार्यक्रम होणार? महाविकास आघाडीचा भाजपाला 3 जागांचा प्रस्ताव

सहकार विकास पॅनेल (महाआघाडी) :

सोसायटी गट : आटपाडी- तानाजी पाटील, कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे, खानापूर- अनिल बाबर, पलुस- महेद्र लाड, कडेगाव-मोहनराव कदम, वाळवा- दिलीप पाटील, शिराळा- मानसिंगराव नाईक, मिरज- विशाल पाटील, जत-विक्रम सावंत, तासगाव- बी. एस. पाटील. महिला राखीव- जयश्री मदन पाटील, अनिता विजय सगरे. अनुसूचित जाती जमाती-बाळासाहेब होनमोरे, ओबीसी-मन्सुर खतीब, विमुक्त जाती व भटक्या जमाती-राजेंद्र डांगे, इतर सहकारी संस्था- वैभव शिंदे, प्रक्रिया संस्था-सुरेश पाटील, पतसंस्था गट- किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था-हणमंतराव देशमुख, सुनील ताटे.

भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल :

सोसायटी गट : आटपाडी- राजेंद्र उर्फ रुस्तुमराव देशमुख, कडेगांव- तुकाराम शिंदे, वाळवा - भानुदास मोटे, मिरज - उमेश पाटील, जत- प्रकाश जमदाडे, तासगाव- सुनिल जाधव. महिला राखीव- श्रीमती दिपाली पाटील, श्रीमती संगीता खोत. इतर मागासवर्गीय- तम्मणगौडा रवि, भटके विमुक्त - परशुराम नागरगोजे, अनुसूचित जाती- रमेश साबळे, प्रक्रिया संस्था- सी.बी.पाटील, पतसंस्था गट- राहुल महाडीक, अजित चव्हाण, मजूर संस्था- संग्राम देशमुख, सत्यजीत देशमुख.

NCP-BJP-Shivsena
जिल्हा बॅंक निवडणुकीतून भाजपच्या संजयकाका पाटलांची माघार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com