जिल्हा बँक तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है; NCP नेत्याचं भाजपला चॅलेंज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

पालकमंत्री जयंत पाटील यांनी बाळासाहेबांना जिल्हा बँकेची सलग दुसऱ्यांना उमेदवारी दिली.

'जिल्हा बँक तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है'

सांगली - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि जिल्हाभर जल्लोषाला सुरवात झाली. कुठे जेसीबीने गुलाल, फुले उधळली गेली तर कुठे फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. मिरज शहरात मात्र वेगळेच चित्र समोर आले. तेथे जिल्हा बँकेच्या विजयाच्या जल्लोषात मिरज विधानसभा मतदार संघाचाही बिगुल वाजवला गेला. राष्ट्रवादीच्या बाळासाहेब होनमोरे यांनी 'जिल्हा बँक तो झाँकी है, मिरज विधानसभा बाकी है' चा नारा देत भाजपला मैदान दूर असताना आव्हान देत शड्डू ठोकला.

हेही वाचा: Sangli Bank - भाजपचे महाडिक विजयी; महाविकासला मोठा धक्का

बाळासाहेब होनमोरे हे सलग दुसऱ्यदा मागासवर्गीय प्रवर्गातून जिल्हा बँकेवर विजयी झाले आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी बाळासाहेबांना जिल्हा बँकेची सलग दुसऱ्यांना उमेदवारी देऊन मिरज विधानसभेसाठी ते प्रबळ दावेदार असतील, असे संकेत दिले आहेत. कारण, पुढचा आमदार राष्ट्रवादीचा अशी घोषणाही जयंतरावांनी आधीच केली आहे. त्यामुळे बाळासाहेबांना लढायचे नवे बळ मिळाले आहे. आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर ते बळ दाखवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांना केला. पुढील निवडणुकीत मिरजेचा नूर काय असेल, याचे संकेतही या जल्लोषातून मिळाले. मिरजेत आता भूमीपूत्र हवा, असा संदेशही यानिमित्ताने पेरला गेला.

मिरज विधानसभा काँग्रेस लढवत आले. बाळासाहेबही काँग्रेसकडून लढले होते. पुढे स्वतंत्र लढताना ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बॅट हाती घेतली होती. तीनही वेळेला त्यांना यश आले नाही, मात्र गेल्या विधानसभेची कामगिरी त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारी ठरली होती. आता जिल्हा बँकेतील विजयानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेचे बाशिंग बांधले आहे.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

loading image
go to top