Satara DCC Bank
Satara DCC Bank

या संचालकांना तीन महिन्यांची मुदतवाढ

सातारा : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना व राज्यातील 22 जिल्हा बॅंकांची निवडणुक घेण्याची जबाबदारी क्षेत्रिय अधिकाऱ्यांवर आली आहे. दोन्ही कामे समांतर पध्दतीने राबविल्यास कर्जमाफी योजनेच्या अमंलबजावणीत अडचणी येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या सहकारी बॅंका व कृषी सहकारी पतसंस्था वगळून उर्वरित सहकारी बॅंका व सोसायट्यांची निवडणुक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. 

राज्यातील 31 पैकी 22 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, 21 हजार 225 प्राथमिक कृषी सहकारी संस्थांपैकी 8194 संस्थांची निवडणुक जानेवारी ते जून या कालावधीत होऊ घातल्या आहेत. संचालकांची मुदत संपण्यापूर्वी या संस्थांची निवडणुक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. या संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी राज्य सहकार निवडणुक प्राधीकरणाकडे आहे.

 शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी विविध विभागाचे क्षेत्रिय अधिकारी व्यस्त आहेत. निवडणुकीसोबतच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी समांतर पधदतीने राबविल्यास कर्जमाफी योजनेत अडथळा येण्याची शक्‍यता आहे. संचालक मंडळाची निवडणुक ही वैधानिक जबाबदारी असल्याने कर्जमाफी योजनेत विलंब होण्याची शक्‍यता आहे. तसेच झाल्यास कर्जमाफी योजनेत बाधा येऊन पुढील खरिप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास पात्र करण्यात बाधा येण्याची शक्‍यता आहे. 


ज्या संस्थांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा संस्था वगळून उर्वरित सर्व सहकारी बॅंका व विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका शासनाने तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या संस्थांच्या संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. आता तीन महिन्यांनी पुन्हा निवडणुकीची सर्व प्रक्रिया राबवावी लागणार आहे. 

सातारा जिल्हा बॅंकेत संचालक होण्यासाठी माण तालुक्‍यात जोरदार तयारी सुरूआहे. काल सोसायट्यांचे ठराव करण्यावरून भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यातील संघर्ष उफाळला होता. कुळकजाई येथील सोसायटी ठरावावरून दोन्ही गोरे बंधूंनी परस्पर विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. आज तर शासनाने जिल्हा बॅंकेची निवडणुक तिन महिने पुढे ढकलली आहे. त्यामुळे कालच्या प्रकाराला आज पूर्ण विराम मिळाला आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com