
सागली : नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात ८०० प्रस्ताव मंजूर करत जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. योजना सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच जिल्ह्याची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद साजरा करण्यात आला.