"हॉटस्पॉट' मणदूरला विभागीय उपायुक्तांची भेट

शिवाजीराव चौगुले
Tuesday, 14 July 2020

शिराळा (सांगली)-  शिराळा तालुक्‍यातील मणदूर गावाला भेट देऊन "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या उपाययोजनांचा आढावा पुणे विभागाचे उपायुक्त पी. बी. पाटील यांनी घेतला. 

शिराळा (सांगली)-  शिराळा तालुक्‍यातील मणदूर गावाला भेट देऊन "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या उपाययोजनांचा आढावा पुणे विभागाचे उपायुक्त पी. बी. पाटील यांनी घेतला. 

सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्‍यातील मणदूर हे "कोरोना' चे "हॉटस्पॉट' बनले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 63 रुग्ण या मणदूर गावामध्ये आहेत. त्यानंतर शिराळे खुर्द येथे 20 रुग्ण आहेत. तालुक्‍यातील आजअखेरची कोरोना बाधित रूग्णसंख्या 143 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांची तुलना केली तर शिराळा तालुका "कोरोना' रूग्णांच्या संख्येत एक नंबरवर आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नजरा तालुक्‍यावर आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर उपायुक्त पाटील यांनी मणदूर व शिराळे खुर्दला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी मुंबईला जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवा. 50 वर्षे वयावरील लोकांची नियमित तपासणी करा अशा सूचना दिल्या. गावात कोणकोणत्या उपाय योजना केल्या जात आहेत याची माहिती उपायुक्त पाटील घेतली. तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. मनजीत परब , डॉ. नंदकुमार गवारी, सहायक पोलिस निरीक्षक डी.बी.कदम, सरपंच वसंत पाटील, ग्रामसेवक एम. एन. पाटील ,तलाठी भास्कर पाटील उपस्थित होते. 

 

संपादन : घनशाम नवाथे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Deputy Commissioner visits Hotspot Mandoor