बेळगाव : लग्न समारंभ वेळी डिजे लावायचा असेल तर परवानगी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DJ

बेळगाव : लग्न समारंभ वेळी डिजे लावायचा असेल तर परवानगी घ्या

बेळगाव: लग्न समारंभ वेळी डिजे लावायचा असल्यास त्यासाठी संबंधित खात्याकडून पूर्वपरवानगी घेणे गरजेचे बनले आहे. अन्यथा पोलीस संबंधितावर गुन्हे दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त करत आहेत. त्याचबरोबर बँडसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पीकरसाठी देखील परवानगी घेतली पाहिजे. पोलिसांनी डीजे विरोधात कारवाईची धडक मोहीम सुरू केल्याने साऊंड सिस्टम व बॅंड मालकांचे धाबे दणाणले आहेत.

मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात डीजेचा आवाज वाढविला जात आहे. त्यामुळे याचा त्रास बालवृद्धांना सहन करावा लागत आहे. आवाजाच्या मर्यादेवर अंकुश आणण्यात यावा, अशी सूचना राज्य सरकारने केली असल्याने त्याची पोलीस खात्याकडून अंमलबजावणी केली जात आहे, हळदी कार्यक्रमादरम्यान तालुक्यात मध्यरात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर धुडगुस घातला जात आहे. त्यामुळे याचा त्रास गल्लीतील लोकांना सहन करावा लागत असल्याने अनेक जण ११२ या टोल फ्री क्रमांकावर संबंधितांची तक्रार करत आहेत.

त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना याबाबत कारवाई करण्याची सूचना केली जात आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रात्री उशिरापर्यंत डीजेच्या आवाजवर डान्स केला जात होता. त्यामुळे याबाबत काहींनी ११२ नंबरवर तक्रार केल्याने पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. दोन दिवसात जाफरवाडी आणि गोजगे येथील लग्न समारंभ वेळी साऊंड सिस्टीम वापरल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच डीजे सिस्टम देखील जप्त करण्यात आली आहे. भविष्यात मोठ्या आवाजाने साऊंड सिस्टम लावण्यात येऊ नये तसेच संबंधित खात्याकडून परवानगी घेतली पाहिजे. अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

काकती पोलीस निरीक्षकांना नोटीस

काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मध्यरात्री उशिरापर्यंत हळदी कार्यक्रमावेळी मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आल्याने काहींनी याबाबत ११२ क्रमांकावर तक्रार केली. त्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी ही बाब गांभीर्याने घेत काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांना घडल्या प्रकारावरून नोटीस बजावली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक निरिक्षक धास्तावले असून त्यामुळे त्यांनी डीजे विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Dj Permission Impossible Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top