विटा रुग्णालयाचा कारभार प्रभारी डॉक्टरांवर

सोनोग्राफी, एक्स-रे मशिन बंद : पूर्णवेळ डॉक्टरांची गरज
Vita Hospital
Vita Hospitalsakal
Updated on

विटा : येथे महाराष्ट्र शासनाचा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय दवाखाना आहे. मात्र, डॉक्टरांच्या प्रतिनियुक्तीने येथील कारभार रामभरोसे सुरू आहे. याठिकाणी पूर्णवेळ डॉक्टरांची नेमणूक नसल्यामुळे सेवेवर परिणाम होत आहे. सोनोग्राफी, एक्स-रे मशिन चालविण्यासाठी तज्ज्ञ टेक्निशियन नसल्यामुळे त्या बंद आहेत. येथे पूर्णवेळ डॉक्टरांची गरज आहे.

Vita Hospital
जळगाव : कोरोनाकाळात प्रशासनाचे कार्य उल्लेखनीय ; गुलाबराव पाटील

येथे यशवंतनगरमध्ये विटा-साळसिंगे रस्त्यालगत महाराष्ट्र शासनाचा एक कोटी रुपये खर्चून तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय दवाखाना उभारला आहे. याठिकाणी सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, लेखनिक व ड्रेसर असा स्टॉफ मंजूर आहे. त्यापैकी ड्रेसर पद रिक्त आहे. पशुधन विकास अधिकारी यांना प्रतिनियुक्तीवर येथे पदभार देण्यात आला आहे; तर सहाय्यक आयुक्तांनाही विटा व जतचा कार्यभार आहे. त्यामुळे येथील कारभार रामभोरेसेच आहे. कायमस्वरुपी डॉक्टरांची आवश्यकता आहे. विटा परिसरातील जनावरांना उपचार करण्यासाठी सोयीचे आहे. मात्र, हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शेतकरी जनावरांना उपचारासाठी या दवाखान्यात घेऊन येत आहेत. खासगी पशुवैद्यक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जनावरांवर उपचार करत आहेत. त्यामुळे शेतकरी दवाखान्याकडे फिरकत नसल्याचे येथील डॉक्टर सांगत आहेत. पूर्णवेळ डॉक्टरांची नेमणूक झाल्यास दवाखान्यात जनावरांवर उपचार घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. कुत्रा, मांजर यावरच उपचार करण्यासाठी जास्त लोक येत आहेत. शेळ्या व मेंढ्या, जनावरे क्वचितच उपचारासाठी येत असल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली.

Vita Hospital
कुरळप : रब्बीत सोयाबिन लागवडीचा धडाका

एक कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा दवाखाना डॉक्टरांअभावी दोन वर्षे बंद होता. तो आता तात्पुरत्या डॉक्टरांच्या नेमणुकीवर सुरू आहे. येथे असणारे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. बी. एस. सावंत यांनी मे २०२१ मध्ये येथील पदभार घेतला आहे. तेही चार महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त राहण्याची शक्यता आहे.

या दवाखान्यासाठी विटा पालिका हद्दीतील कार्यक्षेत्र आहे. खानापूर, कडेगाव, मायणी या भागातील जनावरे शेतकरी घेऊन आले तरीही आम्ही उपचार करतो. येथे सोयींनीयुक्त दवाखाना असूनही शेतकरी जनावरांना उपचारासाठी घेऊन येत नाहीत. खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले जात आहेत. या दवाखान्यात येण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नाही. ती बदलण्याची गरज आहे.

- डॉ. बी. एस. सावंत, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, विटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com