भोसे गावात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला दोघांचा चावा

 गुरूदेव स्वामी
गुरुवार, 16 मे 2019

भोसे (ता : 15) पिसाळलेल्या कुत्र्याने भोसे येथे अंकुश सुखदेव हसबे व राजाक्का शिवू स्वामी यांच्यावर अचानक हल्ला करुन चावा घेतल्याने परिसरात ग्रामस्थांमंध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भोसे (ता : 15) पिसाळलेल्या कुत्र्याने भोसे येथे अंकुश सुखदेव हसबे व राजाक्का शिवू स्वामी यांच्यावर अचानक हल्ला करुन चावा घेतल्याने परिसरात ग्रामस्थांमंध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंकुश हे आपल्या वस्ती जवळ असणाऱ्या हातपंपावर पाणी नेण्यासाठी येत असताना अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने उडी मारून  त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या डोळ्यांच्या वरचेवर जोरदार चावा घेतला. तसेच राजाक्का स्वामी या काल सायंकाळी आपले वस्तीसमोर कपडे धुत असतांना याच कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करुन दोन्ही हाताला जोरदार चावा घेऊन जखमी केले आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील बाळासो बंडगर यांचेवर झोपेतच पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्यांचे डोळ्याच्या वरच्याबाजूस चावा घेऊन त्यांना जखमी केले होते. 

हसबे वस्ती परिसरातील दोन-तीन इतर कुत्र्यांना व व दोन-तीन शेळ्यांना तसेच एका म्हशीला हे पिसाळलेले कुत्रा चावल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ उकाड्यापासून सुटका व्हावी म्हणून वस्तीसमोर झोपतात व जनावरेही बाहेर असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

दरम्यान, भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पिसाळलेल्या कुत्र्यांची लस उपलब्ध नसल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने आधीच दुष्काळ त्यात पुन्हा फाल्गुन मास अशी अवस्था या रुग्णाची झाली आहे

Web Title: dog bite two person in bhose village