esakal | खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडली 
sakal

बोलून बातमी शोधा

खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडली 

नगर-मनमाड महामार्गावरील श्री मार्तंड म्हाळसापती देवस्थान ट्रस्टच्या खंडोबा महाराज मंदिराच्या गेटवरून मध्यरात्री चोराने आत प्रवेश केला. मंदिराबाहेरच्या दोन दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला

खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : नगर-मनमाड महामार्गावरील श्री मार्तंड म्हाळसापती देवस्थान ट्रस्टच्या खंडोबा महाराज मंदिरातील दानपेटी फोडून रविवारी मध्यरात्री चोरांनी त्यातील रक्कम लंपास केली. याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

दोन पेट्या फुटल्याच नाही

नगर-मनमाड महामार्गावरील श्री मार्तंड म्हाळसापती देवस्थान ट्रस्टच्या खंडोबा महाराज मंदिराच्या गेटवरून मध्यरात्री चोराने आत प्रवेश केला. मंदिराबाहेरच्या दोन दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या फुटल्या नाहीत. त्यामुळे चोराने आपला मोर्चा मंदिरातील म्युझियममध्ये असलेल्या दानपेटीकडे वळविला.

हेही वाचा - तृप्ती देसाईंना कोण हाणायला टपलंय

तेथील दानपेटीचे कुलूप तोडून आतील सर्व रक्कम लंपास केली. आज पहाटे हा प्रकार मंदिराच्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. त्याने फोनवर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे यांना माहिती दिली. त्यांनी खंडोबा मंदिरात धाव घेऊन शिर्डी पोलिसांना माहिती दिली.

शिर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला आहे. दानपेटीतील रकमेबाबत माहिती समजू शकली नाही. याबाबत नागरे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

loading image