crime on vehicle
sakal
सांगली - बेदरकार वाहनचालकांवर पोलिस कारवाई करतात. मात्र, एका उसळत्या रक्ताने भलतेच ‘रील’ तयार केले. बेदरकार वाहनचालवत ‘पावती करायची नाय...’ हा ‘रील’ ‘व्हायरल’ केला. नेटीझन्सच्या अक्षरशः उड्या पडला. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या नेटकऱ्याची चांगलीच जिरवली. त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारत ‘कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल’ची ‘रील’ ‘व्हायरल’ केली आणि या नेटकऱ्यास नमवले.