डोन्ट वरी मुस्तफा... जयंतरावांचे ट्‌विट..! 

अजित झळके
Thursday, 16 July 2020

मुस्तफा... हे नाव सांगलीला आता नवं राहिलेलं नाही. या झपाटलेल्या तरुणाने सांगलीतील बेघरांना, निराधारांना, मानसिक रुग्णांना आधार दिला. त्याच्या "सावली'त 70-80 लोक राहतात.

सांगली ः मुस्तफा... हे नाव सांगलीला आता नवं राहिलेलं नाही. या झपाटलेल्या तरुणाने सांगलीतील बेघरांना, निराधारांना, मानसिक रुग्णांना आधार दिला. त्याच्या "सावली'त 70-80 लोक राहतात. त्याच केंद्रात कोरोनाची लागण झाली आणि सांगली हादरून गेली. कारण, या केंद्राबद्दल साऱ्यांनाच आस्था आहे, जिव्हाळा आहे... त्याच आस्थेने आज पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुस्तफाला धीर दिलाय. जयंतरावांनी ट्विट करताना "डोन्ट वरी मुस्तफा' अशा आशयाचा संदेश दिला आहे. 

""सावली निवारा केंद्र लवकरच कोरोनामुक्त होईल आणि गोरगरिबांची सेवा यापुढेही अखंडपणे सुरू राहील'', असे ट्‌विट जयंतरावांनी केले आहे. या केंद्राच्या पाठिशी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ताकद लावली आहे. येथे शंभर टक्के दक्षता घेऊन उपचार सुरु करण्यात आले आहेत. या भाग संपूर्ण कंटेन्टमेंट झोन करण्यात आली आहे. मोठे पत्रे लावून मुख्य रस्तादेखील सीलबंद करण्यात आला आहे. 

या केंद्रातील एक-दोन नव्हे तर तब्बल 52 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुदैवाने मुस्तफाला कोरोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे गोरगरिबांसाठी झटणारा हा हाडाचा कार्यकर्ते आजही धावपळ करतोय. मोबाईलच्या माध्यमातून साऱ्यांच्या संपर्कात आहे. जयंतरावांनी धीर दिल्याने त्याला आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे जयंतरावांच्या ट्विटमुळे हे केंद्र आता राज्यभर पोहचले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don`t worry mustaffa... jayant patil tweet