
सांगली : गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या आखाड्यात वसंतदादा पाटील यांच्या नातवाला धोबीपछाड देत शिवसेनेची (Shiv Sena) उमेदवारी मिळवणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी प्राथमिक चर्चा केली असून, ते लवकरच पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे.