मोबाईल-पिस्तुल प्रकरणः डॉ. संतोष पोळची येरवड्यात रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - येथील कळंबा कारागृहात सहा खुनाचे आरोप असणारा न्यायालयीन बंदी डाॅ. संतोष पोळ याची  पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रशासकीय कारणास्तव त्याला हलविल्याचे कारागृह अधिक्षक शरद शेळके यांनी सांगितले.

पोळ सध्या कारागृहामध्ये मोबाईल व्हिडिआे चित्रिकरण व बनावट पिस्तुलामुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणाची चाैकशी सध्या सुरू आहे. दरम्यान आज पोळला मोबाईल पुरविल्या प्रकरणी कारागृहातील संशयित अधिकारी व कर्मचारी अशा बारा जणांची कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी चौकशी केली. याबाबत जबाब नोंदवून घेण्यात आले. यासंबधीचा अहवाल त्या उद्या (ता. 30) गृहखात्याकडे सादर करणार आहेत. त्यानुसार दोषींवर पुढील कारवाई होईल, असेही शेळके यांनी स्पष्ट केले. 

संबंधीत बातम्या

कळंबा कारागृहातील आरोपीकडे सापडले मोबाईल, पिस्तूल 

मोबाईल पिस्तुल प्रकरणः कळंबा कारागृहातील दहा कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात 

Web Title: Dr, Santosh Pol transfer to Yeravada