परदेशातील ड्रॅगन फ्रुटची दिघंचीच्या माळावर शेती

‘ए’ ग्रेडचे उत्पादन सुरू; पहिला तोडा १३० रुपये किलोने जागेवर विक्री
Dragon Fruit Farming in Dighanchi atpadi sangli
Dragon Fruit Farming in Dighanchi atpadi sangli

आटपाडी - बदललेला निसर्ग आणि हवामान, पावसाची अनियमितता, वाढलेले रोग यामुळे तालुक्यास वरदान ठरलेले डाळिंब आणि शेतकरी संकटाच्या चक्रात अडकला आहे. शेतकरी पर्यायाच्या शोधात असताना दिघंचीच्या माळावर लावलेले परदेशात येणारे ड्रॅगन फ्रुटपासून ‘ए’ ग्रेडचे उत्पादन सुरू झाले आहे. त्याचा पहिला तोडा १३० रुपये किलोने जागेवर विक्री केला असून सहा महिने उत्पादन सुरू राहणार आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या आटपाडीत ‘टेंभू’चे पाणी आले. पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली, मात्र पाण्यापासून सुजलाम् सुफलाम् शेती करण्यात म्हणावे असे यश अजून तरी दिसत नाही. आटपाडीचा ब्रँड म्हणजे डाळिंब. वाढलेल्या पावसामुळे ते धोक्यात आले. शेतकऱ्यांनी ५० टक्क्यांवर बागा काढल्यात. शेतकरी ढोबळी मिरची, शेवगा, वांगी, द्राक्ष, बांबू लागवडीकडे वळतोय. मात्र अजून डाळिंबाला पर्याय शाश्वत सापडला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत विष्णू मोरे यांनी लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन सुरू झाले आहे.

पहिला तोडा ९०० किलोचा झाला. त्याला १३० रुपये किलो भाव मिळाला. ‘ए’ ग्रेडचा माल होता. सहा महिने उत्पादन चालू राहणार आहे. विष्णू मोरे टेक्सटाइलमध्ये नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर गावी आले. वडिलोपार्जित शेती विकसित केली. पाणीसाठा करण्यासाठी शेततळे घेतले. गेल्या वर्षी तीन एकरांत परदेशात येणारे ड्रॅगन फ्रुटची दहा बाय सहा अंतरावर माती बेडवर लागवड केली. तीन एकरांत ६४०० रोपे बसली. त्यासाठी प्रतिपोल आणि रिंग चारशे रुपयांप्रमाणे १६०० सिमेंटचे पोल आणि रिंग खरेदी करून उभा केले.

एका पोलभवती चार रोपे लावलीत. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन केले. सरासरी तीन एकरांसाठी १५ लाख रुपये खर्च आला. आता पहिलेच उत्पादन सुरू झाले असून दर महिन्याला एक ते दोन तोडा निघतो. तो डिसेंबरपर्यंत चालू राहील. रोपे लहान असल्याने पाच टन उत्पादन निघेल. दुसऱ्या वर्षी १५ ते २० आणि तिसऱ्या वर्षी ४० ते ५० टन उत्पादनाचा अंदाज आहे. तीन वर्षांत केलेली गुंतवणूक निघेल.

गुंतवणूक जास्त; पण उत्पादनखर्च कमी

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी एकरी २००० झाडांसाठी सुरवातीलाच पाच लाख रुपये खर्च येतो. तुलनेत उत्पादनखर्च अत्यंत कमी आहे. फक्त शेण आणि वर खतासाठी माफक खर्च होतो. दोन-चार फवारण्या होतात. मजुरीचा खर्च शून्य आहे. त्यामुळे जेवढे उत्पादन तो नफाच राहतो.

नोकरीनिमित्ताने परदेशात आणि इस्त्राईलला जाण्याचा योग आला. तिथे कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुट येत असल्याचे पाहिले. आपल्या भागात पाणी कमी असते. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट लागवडीचा त्या वेळी संकल्प केला होता. आता लागवडीतून प्रत्यक्ष ग्रेड वनचे उत्पादन घेतल्याचा वेगळाच आनंद आहे.

- विष्णू मोरे (उत्पादक शेतकरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com