वेळ घालवण्यासाठी नाटके, कथाकथन व्हायरल 

Drama, storytelling, viral to pass the time.
Drama, storytelling, viral to pass the time.


सांगली : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाला आहे. सर्व काही बंद आहे. त्यामुळे घरी बसून वेळ कसा घालवायचा असा प्रश्‍न पडला आहे. मात्र त्यासाठी आता सोशल मिडियावर विनोदी नाटके, गाजलेली पुस्तके, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे अशा साहित्यिकांची कथाकथने व्हायरल झाली आहेत. 


कोरोना विषाणू हा संपर्कातून वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. कोरोनाची साथ जगभरात धुमाकूळ घालत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी संक्रमणाची साखळी तोडणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने टप्प्याने शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा, जीम, जलतरण केंद्रे, नाट्यगृहे, चित्रपट थिएटर, मॉल, मल्टीप्लेक्‍स बंद केले. नंतर पहिली ते आठवीपर्यंतच्या परिक्षाही रद्द केल्या. दहावीचा एक पेपर बाकी आहे तोही पुढे ढकलला. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के,25 टक्के अशी कमी केली. आता पाच टक्केच कर्मचारी काही कार्यालयांमध्ये असतात. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस देशच लॉकडाऊन केल्याची घोषणा केली. 

या लॉकडाऊनमुळे आता नागरिकांना आपल्या कुटुंबियांसमवेत घरीच थांबावे लागत आहे. मात्र टी. व्ही. पाहावा तर क्रिकेटची मालिका आणि आयपीएलही रद्द झाली आहे. कुटुंब एकत्र आल्याने त्यांच्यात गप्पा रंगत आहेत. कॅरम, बुध्दीबळ यासारख्या खेळात बालचमू रमत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सोशल मिडियावर नाटके, कथाकथन, गाण्यांच्या लिंक फिरत आहेत. 

यदाकदाचित, सौजन्याची ऐशी तैशी, एका लग्नाची गोष्ट, श्रीमंत दामोदर पंत ही नाटके तसेच पु. ल. देशपांडे, व. पु. काळे यांच्या विनोदी कथाकथने आणि जुनी हिंदी गाण्यांची लिंक व्हायरल होत आहे. वेळ घालवण्यासाठी या नाटकांचा, विनोदी कथाकथनाचा आनंद सध्या नागरिक घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com