नाट्यकलाकारांनी उघडली  सांगलीत रक्तदान चळवळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सांगली- "कोरोना' ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून रक्तदान चळवळीवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणची शिबीरे बंद आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे येथील नाट्य कलाकारांनी आज रक्तदान चळवळ सुरु केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेतील दहाजणांनी पहिल्या दिवशी रक्तदान केले. 

सांगली- "कोरोना' ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून रक्तदान चळवळीवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणची शिबीरे बंद आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे येथील नाट्य कलाकारांनी आज रक्तदान चळवळ सुरु केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेतील दहाजणांनी पहिल्या दिवशी रक्तदान केले. 

शाखेचे अध्यक्ष शफी नायकवडी म्हणाले, ""कोरोना म्हणजे मानवतेचा दुश्‍मन म्हणावा लागेल. या दुश्‍मनाशी लढा द्यायला युध्द पातळीवर तयारी सुरु झालीय. सरकार आपल्या परिने प्रयत्न करतच आहे. पण प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव सुध्दा करुन देत आहे. अचानक एक बाब समोर आली असून ती धक्कादायक आहे. आपल्या कणखर आणि राकट देशात केवळ 15 दिवस पुरेल एवढा रक्त साठा शिल्लक आहे.

आपल्यातला कलाकार अस्वस्थ झाला आहे. मायबाप प्रेक्षक सुदृढ तर कलाकार सुदृढ राहतील. समाज निरोगी तर रंगभूमी निरोगी राहील केवळ याच भावनेने आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून अ.भा. मराठी नाट्यपरीषदेच्या चिंतामणीनगर शाखेने एक संकल्प केला आहे.'' 

ते म्हणाले, ""जे आपल्याकडे हक्काच आहे ते दान करण्याचा अर्थात रक्तदानाचा निर्णय घेतला. सर्व सभासदांना आवाहन केले. सांगली शहरात संचारबंदी असुन सुध्दा पहिल्याच दिवशी 10 जणानी रक्तदान केले. यामध्ये सचिन खुरपे, शाहीर देवानंद माळी, विठ्ठल चव्हाण, गंधार धामणीकर, सुमिधा धामणीकर, श्रीराम माणिकराव जाधव, हरीष जाधव, शफी नायकवडी, माणिकराव जाधव, नाजनीन नायकवडी यांनी भाग घेतला.

यापुढे सुद्धा शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राहु असा निर्धार नाट्यपरिषदेच्या चिंतामणी नगर शाखेच्या वतीने करणेत आला आहे. जास्तीत जास्त रंगकर्मीनी रक्तदान करावे. अर्थात सोशल डिस्टन्स पाळून, असे आवाहन देखील करणेत आले आहे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dramatists opened a blood donation movement